रावेर कृ.उ.बा. समितीत मविआच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय…

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रावेर कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडी तेरा जागांवर विजय मिळवत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन जनतेने दिलेला कौलचा आम्ही आदर करतो. शेतकरीहीतासाठी पॅनल काम करणार असल्याचे मत पॅनल प्रमुख माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार शिरीष चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले.

कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला तेरा जागा मिळत कौल मिळाला तर भाजपा पुरुस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनला तीन जागा तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. तर प्रहार जनशक्तीच्या परिर्वतन शेतकरी पॅनलचे खाते सुद्धा उघडले नाही. मतदारांनी सर्वाधिक मते माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांना मिळाली आहे. मात्र यावेळी आ. एकनाथराव खडसे यांचे समर्थक कैलास सरोदे आणि आ. शिरीष चौधरी यांचे समर्थक किशोर चौधरी असलेले महाविकास आघाडीतील उमेदवारांचा पराभव झाला. रावेर बाजार समितीची झालेली निवडणूक अतिशय चुरशिची झाली. निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत पटाके फोडून एकच जल्लोष केला.

 

विजयी झालेले उमेदवार…

विकासो सोसायटी मतदारसंघात मंदार मनोहर पाटील (३४४ मते ), राजू ठेकेदार (३४२ मते), प्रल्हाद पाटील(३१३मते), डॉ राजेंद्र पाटील(२९३मते), योगिराज पाटील(२८०मते), पंकज पाटील (२९५मते), पितांबर पाटील(२६२ मते), महिला राखीव मतदार संघ मनिषा सोपान पाटील (४०६ मते), सुनिता दिनेश पाटील (३२४), ओबीसी मतदारसंघ सचिन रमेश पाटील (३८४ मते), एनटी मतदारसंघ जयेश राजेंद्र कुयटे (३१९ मते), ग्राम पंचायत सर्वसाधारण गणेश ज्ञानेश्वर महाजन (४०४), योगेश ब्रीजलाल पाटील (२८५), एसटी/एसटी मतदारसंघ सिकंदर जमशेर तडवी (३५१), ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ पांडुरंग शिवदास पाटील (४१८), व्यापारी मतदार संघ रोहीत अनिल अग्रवाल (४४६), विलास श्रवण चौधरी (३४३), हमाल मापाडी सैय्यद अजगर सैय्यद टुकडू (१८९).

Leave A Reply

Your email address will not be published.