रावेरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत…

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज सकाळी १० वाजेपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारी अनेक सखल भागात पाणी साचल्याने,नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. यामुळे विवरे खुर्द येथील वाघाडी नाल्याला आलेल्या पुराने नाल्याच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. हि परिस्थिती तब्बल २५ वर्षांनी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामाना करावा लागला आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. यात ऐनपूर येथील शिक्षक पती-पत्नी चारचाकी गाडीतून घरी जात असतांना, अजंदा गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात ते वाहून जात होते पण नागरिकांच्या सतर्कतेने त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात यश आले. तर गाडी मात्र पुरात वाहून गेल्याची हृदयाचे ठोके वाढवणारी घटना घडली.

रावेर येथील नागझिरी नदीला आलेल्या पुराने धोक्याची पातळी गाठली होती. दोन्ही काठ नदी वाहत असल्याने नदी काठावरील अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडला. सावदा रोडवरील नाल्याला आलेल्या पुराने याभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. अष्टविनायक नगर, श्रीकृष्ण नगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.तर सरदार जि.जि.हायस्कूल परिसरात पाणी साचल्याने शाळेला तलावाचे स्वरूप आले आहे. उटखेडा, मोरगाव, कुंभारखेडा सर्व दूर पूर परिस्थितीची निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.