रावेर विधानसभा सभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी

0

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अजून सव्वा वर्ष बाकी असताना आतापासूनच जिल्ह्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघातून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे (Gulabrao Patil) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या युतीचे उमेदवार देवकर असतील. आता राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) जिल्ह्यातील एकमेव मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या मतदार संघातून उमेदवार देण्यासंदर्भात अद्याप जाहीर केलेले नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार असतील की नाही यांची अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. भाजप तर्फे जळगाव ग्रामीणची जागा शिवसेनेसाठी सहजपणे सोडली जाईल का? हा खरा प्रश्न आहे. कारण गुलाबराव पाटलांविरुद्ध भाजप तर्फे बंडखोरी करून 2019 ची निवडणूक लढवलेले चंद्रशेखर अत्तरदे यांनाच भाजपतर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख पदी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात चौरंगी सामना होणार की दुरंगी हे अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. जिल्ह्यातील यावल रावेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे शिरीष चौधरी (Shirish Chowdhary) यांची आमदारकीची कारकीर्द चांगली आहे. ते जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. एक सुसंस्कृत राजकीय वारसा लाभलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली ओळख जपलेली आहे. त्याच यावल रावेर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर इच्छुकांची बहुगर्दी निर्माण झाली आहे. माजी आमदार अरुण पाटील हेही पुन्हा आमदारकीची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यात नव्याने भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे सुपुत्र माजी आमदार मनीष जैन यांची. रावेर मधून विधानसभा लढवण्याची इच्छा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन (Ishwarlal Jain) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात उभी फूट पडल्यानंतर ईश्वरलाल जैन शरद पवार गटातील अजित पवार यांचे बरोबर आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या ते आजारी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ईश्वरलाल जैन यांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. तथापि त्यांची सुपुत्र माजी आमदार मनीष जैन (Manish Jain) यांनी मात्र अजित पवार यांना समर्थन केल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चे नवनियुक्त मंत्री अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांचे समवेत रावेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी देखील केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली तर आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन हे कोणत्या पवारांकडे आहेत हे अद्या स्पष्ट झाले नसले तरी मनीष जैन यांनी पाच मात्र अजित पवारांना समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ समर्थनच नव्हे तर रावेर मतदार संघाची उमेदवारी अजित पवारांनी मनीष जैन यांना द्यावी अशी मागणी देखील केली आहे. माजी खासदार ईश्वराला जैन आणि मनीष जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या पवारांना समर्थन राहील हा एक वेगळा चर्चेचा विषय होणार असल्याने त्यावर दैनिक लोकशाही तर्फे स्वतंत्रपणे भाष्य करण्यात येईल. परंतु ईश्वरलाल जैन यांचे सुपुत्र माजी आमदार मनीष जैन मात्र रावेर विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून 2018 ला मनीष जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना निवडणूक लढवली आणि जोरदार आपटी खाल्ली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेले असताना पूर्ण ताकदीने ते निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत हा त्यांचा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल.

रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार कै. हरिभाऊ जावळे (Haribhau Jawle) यांचे सुपुत्र अतुल जावळे यांचे नाव भाजप तर्फे आघाडीवर असताना डॉ. कुंदन फेगडे भाजप तर्फे हेही विधानसभा निवडणूक लढवण्याच्या इच्छुकांमध्ये आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या वेळी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांपैकी मध्ये डॉ. कुंदन फेगडे यांचे नाव चर्चिले जाते. तथापि डॉ. कुंदन फेगडे मात्र ‘पक्ष जी जबाबदारी झोप येईल ती पार पाडेल’ असे दरवेळी म्हणतात. रावेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक आणि भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे समीकरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत अपक्ष उमेदवार म्हणून रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून हौस भागवून घेतली. आता अपक्ष आमदार माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे स्वयंघोषित उमेदवारी जाहीर केले आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे विचार अनिल चौधारींकडून कितपत पाळले जातील हे आगामी काळच ठरवेल. त्यामुळे अनिल चौधरी अपक्ष ऐवजी आगामी विधानसभा निवडणूक पक्षाचे उमेदवार असतील एवढेच काय तो फरक राहील. त्यामुळे अनिल चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत फार मोठा पराक्रम करतील अशा आशा पक्षप्रमुख बच्चू कडू करीत असतील तर निवडणुकीनंतर त्यांना त्याचा अनुभव येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.