बॉक्स ऑफिसवर जाळ आणि धूर सोबतच, ‘जवान’च्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये शाहरुखचा दमदार अंदाज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा किंग खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जवान चित्रपटामुळे चर्चेत होता. त्याच्या याच चित्रपटाची ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांनी उत्सुकता आणखी वाढवली असून निर्मात्यांनी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यू सोमवारी रिलीज झाला आहे. दोन मिनिट आणि बारा सेकंदाच्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये ॲक्शनचा जोरदार धमाका पाहायला मिळत आहे. शाहरुखसोबत यामध्ये नयनतारा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याही भूमिकाची झलक पाहायला मिळत आहे.

‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा (Nayantara) आणि दीपिका सुद्धा ॲक्शन सीन्स करतांना दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहे. प्रीव्ह्यूची सुरुवातच शाहरुखच्या दमदार आवाजाने होतांना दिसते. दमदार ॲक्शन सीन्ससोबत ‘बेकरार करके’ हे रेट्रो गाणंसुद्धा यामध्ये ऐकायला मिळत आहे.

दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने ‘जवान’ च दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ग्रॅमी पुरस्कार नामांकित आणि लोकप्रिय कलाकार राजा कुमारी यांचा ‘द किंग खान रॅप’ सुद्धा समाविष्ट आहे. त्याची सुद्धा झलक या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.