Saturday, January 28, 2023

अल्पवयीन मुलीला पळवून नेत बलात्कार; गुन्हा दाखल

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेवून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी विलेश दारासिंग पावरा (वय 20) या तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमारे दोन महिन्यापुर्वी विलेश दारासिंग पावरा याने चोपडा तालुक्यातील मजरेहोळ येथे राहणा-या व शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला भुलथापा देवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तसेच शिरपूर जवळील महादेव दोंदवाडे येथे पळवून नेत याठिकाणी त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

- Advertisement -

दरम्यान या घटनेप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला विलेश विरुद्ध भाग 5 गु.र.न. 437/2020 भा.द.वि. 376(1), (अ), 2 (एन), 363 अ, सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून सरंक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4,8,5 (एल)12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे