सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ, गुलाबराव पाटलांची टीका

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटात वाद सुरूच आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी शोधत नाहीय. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर जोरदार निशाण साधला आहे.

चोपडा (Chopda) मतदार संघातील धानोरा गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे (MLA Lata Sonwane) , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे (Former MLA Chandrakant Sonwane) यांची देखील उपस्थिती होती. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील टोला लगावत  म्हणाले की, सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात (उद्धव ठाकरे गट) आल्या असून त्या तीन महिन्यांचं बाळ आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या धरणगाव शहरात होत आहे.

दरम्यान मंत्री पाटील म्हणाले की,  सुषमा अंधारे या तीन महिन्यापूर्वीच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आल्या आहेत. ते तीन महिन्याच बाळ आहे, सुषमा अंधारे यांना बाई म्हणत गुलाबराव पाटील म्हणाले की, या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली चिखलफेक, तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत, त्याच्याही क्लिप दाखवाव्यात. आम्ही आमच्यावर केलेल्या टीका सहन करणार नाही, असा इशारा देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांना दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.