राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा: पहा संपूर्ण वेळापत्रक

0

अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशासह जगभरातील रामभक्त वाट पाहात आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू असून . 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची रूपरेषा 16 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत तयार करण्यात आली आहे.

प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होण्यापूर्वी त्यांच्या वेगवेगळ्या अधिवासांची तयारी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत राललल्लासाठी एक पलंग देखील अयोध्येत तयार करण्यात आला आहे. ट्रस्टने हा पलंग अयोध्येतच बनवला आहे. याशिवाय प्रभू श्रीरामांसाठी गादी, रजाई, बेडशीट, उशी यांचीही खरेदी करण्यात आली आहे. कपडेही तयार करण्यात आले आहेत. या अधिवास दरम्यान, कुशसह देवाच्या हृदयाला स्पर्श करून आणि न्यास पाठ करून संबंधित पूजा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सकाळी विधिवत जागरण केल्यानंतर त्यांना सिंहासनावर बसवले जाईल. तर 21 जानेवारी च्या रात्री शैय्या अधिवास होईल.

22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राण प्रतिष्ठा होईल. वारणसीचे वैदिक आचार्य ही पूजा करणार आहेत. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांनी सांगितले की, आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड, प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, अरुण दीक्षित, सुनील दीक्षित, दत्तात्रेय नारायण रटाटे, गजानन जोतकर, अनुपम दीक्षित आदी हा सोहळा संपन्न करणार आहेत. तसेच 11 यजमान देखील असतील.

प्राणप्रतिष्ठा पूजेचा क्रम

विहिंपनेही सोमवारी प्राणप्रतिष्ठा पूजेचा क्रम स्पष्ट केला असून, मूर्ती ज्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे, तेथूनच कर्मकुटी विधीने पूजेला सुरुवात होणार आहे. मूर्ती तयार करणारे कारागीर प्रायश्चित पूजन करणार आहेत.

16 – जानेवारीपासून पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे.

17 – जानेवारी रोजी श्रीविग्रह परिसरात मिरवणूक काढली जाईल आणि गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.

18 – जानेवारीपासून अधिवास सुरू होतील. दोन्ही वेळा जलाधिवास, सुगंध आणि गंधअधिवास देखील असेल.

19 – जानेवारी रोजी सकाळी फळ आधिवास आणि धान्य आधिवास होईल.

20 – जानेवारी रोजी सकाळी फुले व रत्ने तर सायंकाळी घृत अधिवास होईल.

21 – जानेवारी रोजी सकाळी साखर, मिठाई व मध अधिवास व औषध व शैय्या अधिवास असेल.

22 – जानेवारी रोजी मध्य दिवस रामलल्लाच्या मूर्तीवरील डोळ्याची पट्टी काढून त्यांना आरसा दाखवला जाईल.

 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुहूर्त

22 जानेवारी 2024 रोजी रात्री 12.29 ते 12.30 या वेळेत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अवघ्या 84 सेकंदात पवित्र प्राण प्रतिष्ठा सोहळा या पूजनीय मूर्तीला देवत्व प्रदान करेल.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.