बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध क्रिकेटपटूला ८ वर्षांची शिक्षा

0

नेपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणी वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणी दोषी ठरल्यानंतर संदीप लामिछाने याला ८ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे संदीप लामिछानेला ८ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. शिक्षेसोबतच संदीपला ३ लाख रुपये दंड आणि पीडितेला २ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. न्यायालयाचे माहिती अधिकारी चंद्र प्रसाद पंथी यांनी ही माहिती दिली. नेपाळ क्रिकेट संघाव्यतिरिक्त संदीप लामिछाने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

नेमकं प्रकरण काय ? 

बुधवारी नेपाळी न्यायालयाने संदीप लामिछाने याला शिक्षा सुनावली. अलीकडेच या क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शिशरराज ढकल यांच्या खंडपीठाने संदीप लामिछाने याला दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा सुनावली. संदीप लामिछाने नेपाळ क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका अल्पवयीन मुलीने संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

८ वर्षांची शिक्षा

संदीप लामिछाने नेपाळमधील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. याशिवाय आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछाने हा पहिला नेपाळी क्रिकेटपटू आहे. संदीप लामिछाने आयपीएल २०१८ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याच वेळी, ऑक्टोबर २०२२ मध्ये संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. संदीप लामिछाने याच्यावर काठमांडूतील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर संदीप लामिछाने याला अटक करण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. संदीप लामिछाने जामिनावर बाहेर होता. गेल्या वर्षी १२ जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात संदीप लामिछाने याची २० लाख रुपयांच्या दंडासह जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या क्रिकेटपटूला ८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.