ड्रामा क्वीन राखी सावंत पोलीस स्टेशनमधून गंगुबाई स्टाईलने पडली बाहेर !

0

लोकशाही न्युज नेटवर्क

ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले होते.
राखी सावंतची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राखी गंगूबाईच्या स्टाइलमध्ये बाहेर पडली आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने हिजाब परिधान केल्याचे दिसत आहे. चौकशी झाल्यानंतर पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताना गंगुबाई प्रमाणे हात जोडताना दिसते. राखीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.