पारोळा येथे उद्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडाऊनचे लोकार्पण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या गोडाऊन चे बांधकाम पूर्ण झाल्याने या गोडाऊनचा मान्यवरांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक रमेश पवार व पारोळा शाखा व्यवस्थापक कैलास कुंभेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुलढाणा अर्बन को,ऑप, क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा यासंस्थेच्या स्वमालकीचे पारोळा तालुक्यातील महस्वे शिवारात शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी तसेच गोडाऊन बांधण्यात आले आहे या गोडाऊनचा लोकार्पण सोहळा उद्या दि,२२ रविवार रोजी बॅंकेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुकेशजी ब्रिजमोहन झंवर यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तालुक्याचे आ. चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे

याप्रसंगी माजी मंत्री डॉ,सतिश पाटील माजी खासदार ,ए,टी,नाना पाटील,माजी खासदार वसंतराव मोरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ, हर्षल माने तसेच म्हसवे सरपंच सौ, ज्योती संदानशिव, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार आहे रमेश पवार यांनी सांगितले की गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालावर त्वरित कर्जांची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.