‘नागिन’, ‘जानी दुश्मन’चे लोकप्रिय सिनेदिग्दर्शकाचे निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

हिंदी मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आलीय.  लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मिळालेल्या  माहितीनुसार, राजकुमार कोहली आज सकाळी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते. पण उशिरापर्यंत ते बाहेर न झाल्याने तसेच त्यांचा काही आवाजही न आल्याने त्यांचा मुलगा अरमान कोहलीने  दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील जुहू परिसरातील एका बंगल्यात ही घटना घडली आहे.

राजकुमार कोहली यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांचे  दिग्दर्शन केले आहे. नागिन, जानी दुश्मन, बीवी नौकर का, बदले की आग, राज तिलक, जीने, नहीं दूंगा, इंतकाम, बीस साल बाद सारख्या अनेक सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.