भुसावळ : -छत्रपती संभाजी नगरातील एकाला पिस्तूल खरेदी करणाऱ्या एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले. त्याचा एक साथीदार मात्र फरार झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील योगेश नंदू सांगळे (वय २९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.बाजारपेठपोलिसांनी ही कारवाई गोपनीय माहितीवरून केली. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सांगळे याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडून ६० हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल जप्त केले. या प्रकरणाचा तपास हवालदार नीलेश चौधरी करत आहेत