तेलंगणात निवडणूक प्रचारादरम्यान ५ कोटींची रोकड पकडली

0

रंगरेड्डी ;- पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून जवळपास १७६० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी ही कारवाई केली आहे. ५ कोटींच्या रोख रकमेबाबत कारमधील चालकाची चौकशी केल्यावर त्याने काहीच सांगितले नाही. तसेच, कारममध्ये असलेल्या इतर व्यक्तींनी सुद्धा या रोख रखमेचा कोणता हिशोब दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यावर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून तिघांनाही ताब्यात घेतले.जप्त करण्यात आलेली रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.