रश्मिका – काजोलनंतर रतन टाटा डीपफेकच्या जाळ्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या डीपफेकचे मायावी संकट वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ, काजोल, क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता चक्क उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे.

काय आहे व्हिडिओ? 

या व्हिडीओमधून ऑनलाइन बेटिंगबाबत संदिग्ध व्यक्तींना फसवलं जात आहे. यात रतन टाटा ऑनलाइन बेटिंग कोचला पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच आमिर खान नावाच्या एका व्यक्तिच्या टेलिग्राम चॅनेलशी जोडण्याचं आवाहन ते लोकांना करत आहेत. या फेक व्हिडीओमध्ये रतन टाटा म्हणतात की, लोक मला प्रत्येक वेळी विचारतात की, तुम्ही श्रीमंत कसे झालात? तर मी तुम्हाला माझा मित्र आमिर खान याच्याविषयी सांगू इच्छितो. भारतामध्ये अनेक लोकांनी एव्हिएटर खेळून लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्याचे प्रोग्रॅमर, विश्लेषक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे आभार, यात जिंकण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.