वरणगाव नगरपालिका कर्मचाऱ्यात हाणामारी गुन्हा दाखल

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील सिध्देश्वर नगराला असलेल्या जल शुद्धी केंद्रावर नगरपालिका कर्मचाऱ्याला विनाकरण तीन जणांनी कर्तव्यास येत असतांना काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात वरणगाव नगरपालिकेचे जल शुद्धीकेंद्रावर यशवंत रामदास इंगळे (वय-५८) यांची नेमणुक असल्याने. मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ते कामावर आले. त्यावेळी दुसरे नेमणुक असलेले कर्मचारी सुनिल भिका भुसांडे याच्यासह इतर अनोळखी दोन उपस्थित होते. “कामावर लवकर का आला” असे बोलून यशवंत इंगळे यांना तिघांनी लाकडी काठीने मारहाण केली. व तिघे पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर यशवंत इंगळे यांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुनिल भिका भुसांडे आणि इतर अनोळखी दोन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.