जळगावात कुंटणखान्यावर धाड, ५ महिलांसह ६ पुरुष ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जळगाव शहरातील भजे गल्लीतील ‘लयभारी’ लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच महिला आणि सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. काल १२ सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती.

नवीन बसस्थानक शेजारील गल्लीतील ‘लयभारी’ लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेतली. बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता त्या ठिकाणी पाच महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून पाच महिला, सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. जिल्हापेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांच्या पथकाने केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.