इंस्टाग्राम आयडी मागून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

0

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थिनी वर्गात बसलेली असतांना एका विद्यार्थ्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलल्याने पिडीत विद्यार्थिनीने  पोलीस ठाण्यात त्याच्या विरूध्द तक्रार दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात राहणारी अल्पवयीन विद्यार्थिनी एका महाविद्यालयात शिकत आहे. दिनांक १२ सप्टेबर मंगळवार रोजी सदर विद्यार्थिनी ही आपल्या मैत्रिणीसोबत वर्गात बसलेली असतांना त्याच महाविद्यालयातील एक विद्यार्थी तिच्या जवळ येवून तिला तु इंस्टाग्रामवर रील्स बनवते का? तुझा इंस्टाग्रामची आयडी दे अशी मागणी केली असता विद्यार्थिनीने त्याला मी इंस्टाग्राम वापरत नसल्याचे सांगितले .यावेळी विद्यार्थ्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलला.

दरम्यान विद्यार्थिनीने आपण महाविद्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर तीला महाविद्यालयाच्या इमारती वरून खाली टाकण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.