राहुल गांधींसोबत असलेली ती महिला कोण? यावर कांग्रेसच उत्तर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राहुल गांधी यांनी उजबेकिस्तानचा दौरा केला. मात्र या दौऱ्यापेक्षा त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींबाबत सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे. हिरव्या कॅज्यु्ल टीशर्टमध्ये दिसणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत एक महिलाही आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी ट्रॅव्हल बॅग घेऊन उभे असून त्यांच्याबरोबर एक महिला आणि एक पुरुष आहे. त्यामुळे राहुल गांधींसोबत असलेली ती महिला कोण असा प्रश्न नेटिझन्ससह सरकारमधील अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यासोबत असणारी ती महिला कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नांवर कांग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तर दिलं आहे.

X या समाजमाध्यमावरून त्यांनी पोस्ट करत या फोटोबाबतचा खुलासा केला आहे. “आंधळे संघी आणि २ रुपयांच्या भाजपाच्या टोलर्सची मला दया येते. कारण तुम्हाला मित्र नाहीत किंवा तुमच्यासोबत फिरायला आवडणारे लोक तुमच्याकडे नाहीत. फोटोमधील गृहस्थ हे राहुल गांधी असून त्यांच्याबरोबर त्यांचे बालपणीचे मित्र अमिताभ दुबे आणि ती महिला अमिताभ यांची पत्नी अमूल्या आहे”, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.