ब्रेकिंग; २ हजाराची नोटही चलनातून बाद…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

देशात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे. एकावेळी 20 हजार रुपये, म्हणजेच 2000 रुपयांच्या 10 नोटा बँकेत बदलून त्यांच्या जागी छोट्या नोटा घेता येतील. सर्व बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा असेल. RBI ने सर्व बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा देणे तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय बँकेने म्हटले आहे की ते चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून घेत आहेत आणि लोक या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची 19 प्रादेशिक कार्यालये 23 मे पासून कमी मूल्याच्या नोटांसह 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास सुरुवात करतील.

नोव्हेंबर 2016 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा रातोरात बंद केल्यानंतर, आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली.

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, “इतर मूल्यांच्या बँक नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर 2,000 रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला. त्यामुळे 2000 रुपयांच्या नोटांची छपाई 2018-19 मध्ये बंद करण्यात आली.”

आरबीआयने म्हटले आहे की, ऑपरेशनल सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आणि बँक शाखांच्या नियमित क्रियाकलापांमध्ये व्यत्यय टाळण्यासाठी, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत इतर मूल्यांच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात. एकावेळी 20,000 च्या मर्यादेपर्यंत नोटा बदलता येणार.

Leave A Reply

Your email address will not be published.