जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली.

आज दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले. तर पांडुरंग पाटील हे उपसभापती म्हणून निवडून आले. याप्रसंगी माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांची उपस्थिती होती.

दरम्यान अलीकडेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला होता. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनलला सहा तर एक अपक्ष निवडून आला होता. यामुळे मविआचा सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.