तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन एका विरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील वाक येथील एका गुन्हेगारा विरुद्ध पाचोरा उपविभागीय अधिकारी यांनी जिल्ह्यातून पुढील एक वर्ष हद्दपारीचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे काल त्या हद्दपार असलेल्या तरुणावर भडगाव पोलीसांनी गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील वाक येथील संजय सुरेश त्रिभुवन यास उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये जळगाव जिल्हयातुन १ वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला हित. मात्र सदरचा हद्दपार इसम हा भडगाव शहरात येत असल्याची बातमी मिळाल्याने, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या आदेशावरुन पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ.विलास पाटील, पो.कॉ. स्वप्नील चव्हाण, पो.कॉ.संदिप सोनवणे यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हददपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन सदर इसमाला वाक येथून ताब्यात घेतले. दरम्यान पो.कॉ स्वप्नील चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ संजय पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.