खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चांना उधाण

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे. उदयनराजे आणि अजित पवारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खासदार उदयनराजे भोसले हे काही वेळापूर्वीच सर्किट हाऊसमध्ये दाखल झाले. उदयनराजे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मात्र, आपण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी आलो असल्याचं खासदार उदयनराजे भोसेले यांनी सांगितलं आहे. उपुमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रासारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. उदयनराजे भोसले म्हणाले, अजितदादांसोबत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत उदयनराजे भोसले यांनी म्हटलं, वाईन विक्रीचा निर्णय का घेतला हे सरकारलाच विचारा. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो त्यामुळे काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी हेल्थ इज वेल्थ.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्म समभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो. डिसेंबर महिन्यात उदयनराजे भोसलेंनी घेतली होती शरद पवारांची भेट भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली होती. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होतं.

त्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार दिल्लीत होते. याच दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली. नुकत्याच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली होती त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. असं म्हटलं जात आहे की, ही एक सदिच्छा भेट होती. नुकताच शरद पवारांचा वाढदिवस झाला आणि त्यावेळी शरद पवारांची भेट घेणं शक्य नाही झाले त्यामुळे आता उदयनराजेंनी दिल्लीत पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून ही एक सदिच्छा भेटच होती असं उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.