धक्कादायक; चित्रपटगृहातून बाहेर आला आणि जीवानिशी गेला, वाचा सविस्तर

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्ह्यात वाढ झाल्याचे चित्र सर्वांसमोर आहे. थोड्या दिवसाअगोदर कोयता गँगची दहशत होती, त्यानंतर आता टोळ्यांमध्ये तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला टॉकीजसमोर तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

हि घटना मध्यरात्री १२.१५च्या सुमारास घडली आहे. तरुण चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर येताच टोळक्याने तलवार आणि कोयत्याने तरुणावर हल्ला केला व दगडाने ठेचून त्याची अमानुषपणे हत्या केली. पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नितीन म्हस्के हा मंगळवारी रात्री शिवाजीनगर परिसरातील मंगला टॉकीज या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पूर्व वैमनस्यातून वादातून एका टोळक्याने त्याच्यावर कोयता, तलवार आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली आहे. मृत नितीन म्हस्केवार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती अमोर येत आहे.

मंगळवारी रात्री नितीन म्हस्के चित्रपट पाहून बाहेर आल्यावर त्याच्यावर अचानक धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत नितीन म्हसकेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. तर संबंधित घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.