कोकणसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. राज्यातील काही ठिकाणी २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने १०० मिमी जास्त बरसला आहे. लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आगामी चार ते पाच पावसाचा जात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाचा विभागाचा अंदाज
राज्यात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला. सिंधुदुर्ग, रायगड, आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात दोन दिवस सुट्टी

घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी आणि शुक्रवारी दुर्गम भागात असलेल्या शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहे. पुण्यचाहे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.