परीक्षेबाबत जनजागृती आणि कॉपीचे समूळ उच्चाटन होण्यासाठी १७ रोजी बैठक

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षेबाबत अधिक जनजागृती व्हावी व कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी विविध घटकांना सोबत घेवून बैठकांचे आयोजन केले आहे.

दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, विधी महाविद्यालयांच्या व्यवस्थापन मंडळाचे प्रत्येकी एक प्रतिनिधी, विधी महाविद्यालयातील प्रत्येकी एक शिक्षक आणि मानव्यविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता यांच्या समवेत बैठक होणार आहेत. दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सिनेट सभागृहात सिनेट सदस्य आणि विविध विद्यार्थी संघटनांचे प्रत्येकी दोन पदाधिकारी यांच्या समवेत बैठक होणार आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता महाविद्यालये/परिसंस्था/प्रशाळा यामधील परीक्षेशी संबंधित कामकाज पाहणारा प्रत्येकी एक कर्मचारी व प्रवेश प्रक्रिया तथा एमकेसीएल कार्यप्रणालीचे कामकाज पाहणारे एक कर्मचारी आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांची बैठक होणार आहे. या तीन ही बैठकांना कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित, निकालाची कार्यपध्दती, त्यातील तांत्रिक अडचणी, कॉपीचे समूळ उच्चाटन, परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांनी कॉपी किंवा गैरप्रकार केल्यास होणा-या संभाव्य शिक्षा या संदर्भातील माहिती व जागृती होण्याच्या दृष्टीने या बैठका होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.