दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा भुसावळात केला नष्ट

0

भुसावळ : – येथील पोलिसांनी २०२२ साली जप्त केलेला दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार ५ रोजी डम्पिंग ब्राऊन येथे नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक बबन जगताप, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार, सरकारी पंच आदी उपस्थित होते.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तीन कंटेनरमधून गुटख्याचा माल राजस्थानातून जळगावकडे जात असताना तत्कालीन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ-साकेगाव रस्त्यावर शुक्रवार, 1 एप्रिल 2022 रोजी हा गुटखा आणि कंटेनर असा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई करण्यात आली होती. यावेळी पथकाने तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा तसेच एक कोटी 23 लाख रुपये किंमतीचे तीन कंटेनर असा एकूण साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, जप्त गुटखा पोलिसांच्या ताब्यात असल्याने भुसावळ सत्र न्यायालयाने तो नष्ट (जाळण्याचे) आदेश दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी डंपिंग ग्राऊंडवर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुटखा नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.