जळगावातील गेंदालाल मिल परिसरातील किराणा दुकानात चोरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका किराणा दुकानातून अनोळखी चोरटयांनी दि. ४ ऑक्टोबरच्या रात्री किराणा सामानासह रोकड असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी वासुदेव टिकमल हानंदी (वय ५९) यांचे शहरातील गेंदालाल मिल भागात वासुदेव नावाचे किराणा दुकान असून, ४ रोजीच्या रात्री ९ ते ५ रोजी सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या किराणा दुकानातून ४ हजार २०० रुपयांची रोकड रीन साबण, लाईफ सावन, संतूर साबण, डेटॉल साबण, तूर डाळ कट्टा, बिस्किटचे कार्टून, सोयाबीनचे तेल, पॅराशूट तेल असे एकूण २२ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. याबाबत फिर्याद वासुदेव हानंदी यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाच रोजी दुपारी साडेअकरा वाजता गुन्हा दाखल आला आहे. पुढील तपास उमेश भांडारकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.