उद्धव ठाकरे; निवडणुकीच्या तयारीला लागा, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सूचना

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी सुरु झाली असून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे.

पुणे शहरातल्या सहा विधानसभा मदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तयारी करणार असून, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे चार नगरसेवक शहरभर पदयात्रा काढणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून या चार नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल आणि संजय भोसले या नगरसेवकांची निवडणूक समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.