थांबेल तो संक्या कसला; व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंची खास पोस्ट…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र प्रयोग नंतर असे काही घडले कि,

प्रशांत दामले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. “नियम व अटी लागू” नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण कऱ्हाडे नाटकाची बस चालवताना दिसत आहे. प्रशांत दामले यांनी एक व्हिडीओ शेयर करत एक पोस्त टाकली आहे. जी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

https://www.facebook.com/reel/211390978499407

 

“काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे, प्रयोग १२:३०वाजका संपल्यावर आम्ही सेट भरून, जेवून पहाटे २ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघालो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालू आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

.

Leave A Reply

Your email address will not be published.