Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची जरांगेंसोबत नवी आघाडी
    महाराष्ट्र

    मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची जरांगेंसोबत नवी आघाडी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 27, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्याच्या राजकारणात अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर  यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब झाला आहे.

     7 जागांवर उमेदवार जाहीर

    वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल. प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 मार्चनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं.

    दोघे मिळून लढणार

    प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. आणि दोघे मिळून लढणार”

     

    वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर

    भंडारा-गोंदिया : संजय केवट

    गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी

    चंद्रपूर : राजेश बेले

    बुलडाणा : वसंतराव मगर

    अकोला : प्रकाश आंबेडकर

    अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान

    वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके

    यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार

     

    Jarange Patil Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics prakash ambedkar Prakash Ambedkar Meet Manoj Jarange Patil Vanchit Bahujan aghadi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif