शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्याचे आवाहन

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय कृषी विकास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन २०२२-२३ अंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करुन सुक्ष्म सिंचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत लाभार्थींना मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतंर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पूरक अनुदान देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांनी अर्ज करतांना मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी व ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.