स्क्रब टायफस आजाराचा शिरकाव; बुलढाण्यात आढळले इतके रुग्ण…

0

 

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

कोरोनाने गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणेला भंडावून सोडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा पुन्हा हाय अलर्ट मोडवर आली आहे.

स्क्रब टायफस हा अत्यंत दुर्मिळ असा आजार (Rare Diseases) आहे. या आजाराचे रुग्ण (patients ) अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळले आहेत. केरळमध्ये जून महिन्यात स्क्रब टायफसनं एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यूही झाला होता. आता तर एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्क्रब टायफस चे फक्त खामगावातच 7 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

अधिक माहिती नुसार, खामगाव तालुक्यातील स्क्रब टायफसच्या एका रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्या गंभीर रुग्णावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीनं खामगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आभाळाशी खंडारे यांनी केली आहे.

नेमका काय आहे स्क्रब टायफस आजार…
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) नुसार, स्क्रब टायफस आजार ओरिएंटिया त्सुत्सुगामुशी बॅक्टेरियामुळं होतो. लार्वा मायट्सला कापल्याने हा आजार पसरतो. याला बुश टायफस म्हणूनही ओळखलं जातं. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, कार्डिओ वस्कुलर सिस्टम, श्वासाशी संबंधित आजार आहे. गॅस्ट्रोइन्टेस्टाईन सिस्टीमला प्रभावित करते. योग्य वेळेवर यावर उपचार झाले नाही, तर घातक ठरू शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.