जळगावात जागतिक छायाचित्र दिन साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील पत्रकार भवनात सर्व छायाचित्रकार (प्रेसफोटोग्राफर) एकत्रीत येऊन व जळगाव शहराचे आमदार राजुमाम भोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया व ज्येष्ठ फोटोग्राफर पांडुरंग महाले यांच्या इतर मान्यवरांचा सत्कार करत सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांचा हस्ते पूजन कॅमेरा पूजन करण्यात आले.

फोटोग्राफी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार भगवान सोनार यांनी गीत गायन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली व वातावरणामध्ये प्रफुल्लता निर्माण केली.  याबाबत पत्रकार भगवान सोनार यांचे शामलोही व फोटोग्राफ्ररांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रमात बोलतांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी सांगितले की, अपघाताच्या दृष्टीने जास्त करून अपघात हे मोटरसायकलीचे होत असतात. यामुळे कुठेही बाहेर पडताना हेल्मेट वापरणे आवश्यक प्रेस फोटोग्राफर  एक समाजाचा आरसा आहे आणि फोटो तो मिळवण्यासाठी नेहमी धावपळ करत असतो. म्हणून प्रेस फोटो ग्राफरांनी नेहमी आपली काळजी घेतली पाहिजे. मोटर सायकलवर जात असताना हेल्मेटचा नेहमी वापर करावा असे आवाहन केले.

आमदार सुरेश पुढे यांनी फोटोग्राफरांची अनेक उदाहरणे देत फोटोग्राफर कसा असतो त्याच्या फोटोने काय परिणाम होत असतो, लेखनातून नवे तर फोटोतून तो दर्शवू शकतो. त्याच्या फोटोने काय साध्य होत असतं. एक फोटो हा काय करू शकतो याबाबत संवाद साधला. जीवाची पर्वा न करता जनसेवा हीच राष्ट्रसेवा व्रत घेतलेला या फोटोग्राफर यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांना येणाऱ्या अडचणीबाबत आम्ही तत्पर आहोत असे सांगितले. यानंतर पत्रकार अभिजीत यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.