कोणत्याही खेळात सराव खूप महत्वाचा – राजेश यावलकर

0
  • लोकशाही न्यूज नेटवर्क
  • चीवास प्रीमियर लीगमध्ये भगवे वादळ संघ विजयी
  • चित्तोडगड लॉयन्स संघ उपविजेता : तीन दिवसीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा रावेर येथे समारोप

रावेर :  येथे झालेल्या चीवास प्रीमियर लीग (सिपीएल) मध्ये पुणे येथील मयूर पाटील यांची ओनरशिप असलेला भगवे वादळ संघ विजयी ठरला तर पुणे येथीलच पराग सराफ यांची ओनरशिप असलेला चित्तोडगड लॉयन्स हा संघ उपविजेता ठरला. तीन दिवसीय प्रीमियर लीग पद्धतीने झालेल्या क्रिकेट स्पर्धेचा समारोप 22 जानेवारी रोजी मोठ्या धूमधडाक्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कोणत्याही खेळात सराव खूप महत्वाचा असतो. समाजातील प्रत्येक खेळाडूंनी नियमित सराव करून नैपुण्य मिळवावे. असा संदेश समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेश यावलकर यांनी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना दिला तसेच अश्या क्रीडा स्पर्धांमधूनच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील अश्या सदिच्छा यावलकर यांनी व्यक्त केल्या. तर समारोप समारंभाचे अध्यक्षस्थाना वरून बोलताना अरुणा वाणी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले.

रावेर येथे 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन दिवसात चितोडे वाणी समाजाचे राष्ट्रीय स्तरावर प्रीमियर लीग पद्धतीने क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या या स्पर्धांमध्ये रावेर, यावल, पुणे, जळगाव, नशिराबाद, भुसावळ, सावदा, मुंबई, बऱ्हाणपूर  सह राज्यातील विविध जिल्ह्यातून समाजातील 101 खेळाडू सहभागी होते. प्रत्येक गावांमधील सर्व खेळाडूंनी वेगवेगळ्या आठ संघात सहभाग घेतला होता.

रविवार 22 रोजी क्रिकेट स्पर्धेचा समारोप जळगाव येथील अरुणा वाणी यांचे अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जळगाव येथील राजेश यावलकर, रावेर येथील अशोक शेट वाणी, श्रेयश वाणी, पुणे येथील पराग सराफ, यावल येथील शुभम वाणी, रावेर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत श्रावक, निलेश वाणी, अमोल पाटील, जयेश यावलकर, प्रथमेश खारोळे, अजिंक्य वाणी, धनंजय वाणी, प्रा. मुकुंद वाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वच खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर विजेता आणि उपविजेता संघातील प्रत्येक खेळाडूंना विजयी कप देण्यात आले. 19 रोजी उद्घाटन समारंभासाठी रावेर येथील अशोक शेठ वाणी, पद्माकर महाजन, ऋषिकेशजी महाराज, रावेर येथील पोलीस निरीक्षक कैलास नागरे, डॉक्टर दत्तप्रसाद दलाल, निलेश पाटील, शिरीष वाणी, अशोक काशिनाथ वाणी, डॉक्टर अनंत अकोले, अमोल पाटील, भास्कर महाजन उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रावेर येथील चिवास बालाजी फॉउंडेशन चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. सर्व रावेरकरांचे उपस्थित सर्वच समाजबांधवांनी कौतुक आणि उत्कृष्ठ आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

यावेळी मनोज श्रावक, यशवंत दलाल, मयूर पाटील, पराग सराफ, अंकुश सावदेकर, आदित्य वाणी, संस्कार वाणी, महेश दलाल, किशोर दलाल, हर्षल वाणी, रोहित वाणी, प्रफुल्ल सराफ, चेतन वाणी, शुभम गजेश्वर, प्रथमेश दलाल, जयेश यावलकर, शेखर वाणी, मयुरेश दलाल, दीपेश दलाल, चंदन वाणी, विनय रावेरकर, महेश गजेश्वर, प्रशांत वाणी, सुशील वाणी, राकेश गडे, परेश पाटील, निशांत पाटील, ऋतिक अकोले, अजिंक्य वाणी, किरण वाणी, श्याम गांधी, अमोल पाटील, शुभम खारे, ओम दलाल, अथर्व श्रावक, सोहम दलाल, अथर्व दलाल, श्रीप्रसाद वाणी, वैभव कौशिक, डॉ. राजन अकोले, अमित खारुळ, श्रीकृष्ण वाणी, रुपेश चितोडकर, जयेश सुगंधीवाले या कार्यकर्त्यांचे आणि देणगीदारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

चिवास प्रीमियर लीग यशस्वीतेसाठी निलेश वाणी जळगांव, महेश वाणी जळगांव मिलिंद अकोले जळगांव, संकेत वाणी नशिराबाद, पवन वाणी नशिराबाद, प्रतीक अनंत वाणी नशिराबाद, राहुल वाणी नशिराबाद, शुभम वाणी यावल, सुमित यावलकर भुसावळ, आनंद वाणी बुऱ्हाणपूर, यांनी परिश्रम  घेतले.

विजयी संघ – भगवे वादळ खेळाडू
अथर्व अकोले, प्रतीक वाणी, सिद्धेश श्रावगी, प्रथमेश दलाल, प्रणव गडे, प्रफुल्ल नवलखे- (कॅप्टन), निखिल वाणी, डॉ. राजन अकोले, योगेश अजनाडकर, ऋषिकेश रावेरकर, अंबरीश सराफ, देवेश अकोलेकर

उप विजेता संघ – चित्तोडग लायन्स खेळाडू
अमित विलास असोदेकर, आदित्य पराग वाणी, महेश अरुण वाणी, वेदांत विजय गडे, दीपक चंद्रशेखर वाणी, दीपेश मुकुंद वाणी – (कॅप्टन), महेंद्र केशव दलाल, हर्षल नंदकिशोर माने, पराग सराफ, सौरभ वाणी, चेतन वाणी, हेमंत श्रावगी.

टीम ओनर
1) श्री मयुर प्रभाकर पाटील, रावेर
2) श्री यशवंत वासुदेव दलाल, रावेर
3) श्री पराग जी सराफ, पुणे
4) शुभम जी वाणी, यावल

बेस्ट बॅट्समन (सर्व सामने) – प्रफुल्ल नवलखे जळगाव (230 रन्स)
बेस्ट बॉलर (सर्व सामने) – मयूर पाटील रावेर (7 विकेट)
मॅन ऑफ द सिरीज (सर्व सामने) – पराग सराफ पुणे (103 रन आणि 3 विकेट)
फायर प्लेयर बेस्ट टीम अवॉर्ड – महाराणा प्रताप वॉरियर टीम 

  • मॅन ऑफ द मॅच
    सामना 1 – राहुल वाणी नशिराबाद,
    सामना 2  दिपेश वाणी पुणे
    सामना 3 – प्रफुल्ल नवलखे जळगाव
    सामना 4 – यशवंत दलाल रावेर
    सामना 5 – संकेत वाणी नशिराबाद
    सामना 6 – केदार वाणी नशिराबाद
    सामना 7 – पराग सराफ पुणे
    सामना 8 – प्रफुल्ल नवलखे जळगाव
    सामना 9 – अभिषेक वाणी जळगाव
    सामना 10 – प्रफुल्ल नवलखे जळगाव
    सामना 11 – पराग सराफ पुणे,
    सामना 12 – मयूर पाटील रावेर
    सेमी फायनल 1- प्रफुल्ल नवलखे जळगाव
    सेमी फायनल 2 – पराग सराफ पुणे,
    फायनल – प्रफुल्ल नवलखे जळगाव

विजेते भगवे वादळ संघाला राजेश यावलकर यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मानपूर्वक देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर.

उपविजेता संघ चीतोडगड लायन्स च्या खेळाडूंना अशोक गडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.