धानोरा येथे उद्या श्री संतदेवा महाराजांची यात्रा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
धानोरा येथील महान तपस्वी श्री संत देवा महाराज यांच्या पुण्यतीथी निमित्ताने दिनांक २६ गुरुवार रोजी सालाबादप्रमाणे यात्रा या वर्षी ही भरणार आहे
धानोरा गावाच्या उत्तरेस जुण्याबसस्थानकाजवळील मालाबाई धर्म शाळेच्या त्रिवेणी वृक्षाच्या संगमावर महान श्री संत देवामहाराज युआनचे पुरातन समाधी मंदिर आहे. त्यांच्या नावाने पौष महिन्याच्या अमावस्या नंतर येणाऱ्या गुरुवारी ही यात्रा भरवली जाते. या संत देवा बाबा यांच्या जीवन कैवल्याची अशी अस्खायिका की संत देवा महाराज हे अमळनेरच्या संत सखाराम महाराज यांच्या मठातुन सन १९१५ रोजी धानोरा येथील विठ्ठल मंदीरात वास्तवासाठी राहीले .

त्यांनी त्यांच्या जिवनात मौनवृत धारन केले होते. ते दररोज सकाळी ४ वाजता सात पुडयाच्या पायथ्याशी असलेले कुंड्या पाणी गावात प्रभुराम यांनी मारलेल्या बाणातून पाणी निघत असे त्या पाण्याने आंघोळ करून परत धानोरा येथे येवून जेथे भिक्षा मीळेल तेथेज जावून मागायचे. संत देवा महाराज यांनी सर्व धर्म समभाव व परमेश्वर हा सर्व रुपी आहे .

असे गुण आचरणात आणले तर जीवनात परमार्थ साधता येतो. असे चमत्कारराने ते आपल्या शिष्याला सिद्ध करुन दाखवायचे. संत देवा महाराज निर्गुण निरंकारी होते . लीलावती द्वारे पशुपक्षाची भाषा त्यांना अवगत होती. ते इग्रजाच्या काळात पुणे येथे तहसिलदार होते . त्यांचे पुर्वीचे नाव महादेव वासुदेव पुरंदरे होते . असे महान संत श्री संत देवाबाबा महाराज यांच्या दि १५ जानेवारी १९३६ रोजी विठ्ठल मंदिरात ब्रम्हालीन झाले. गावकरी यांनी गावाच्या उत्तरेस पालक नाल्याच्या काठावर लोकवर्गणीतुन समाधी मंदिर बांधून उभे केले. परिसरात सर्व जाती धर्माचे भावीक मोठ्या भक्ती भावाने नवस फेडतात . यात्रेच्या निमीत्ताने ठिकठीकाणी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते.

तसेच पाळणे, बलून घसरकुंडी, निशानबाज, खेळ विविध खेळणीची दुकाने याठिकाणी थाटण्यात येतात. जिल्हा परिषद निधितुन भव्य देवाबाबा भक्त निवासाची उभारणी केली आहे . तसेच यात्रात्सव शांततेत पार पडावी यासाठी अडावद पो स्टे एपीआय किरण दांडगे आणि उपनिरीक्षक जगदिश कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवलदार सुरेश तायडे, कॉ. शरीफ तडवी ,कॉ. मुकेश तडवी ,कादीर शेख, यांच्या मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.