जुन्या वादातून महिलेसह एकाला मारहाण ; गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाला महिलेसह तीन ते चार जणांनी मारहाण करत जखमी केल्याची घटनाज ळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगरात घडली आहे. याप्रकरणी मंगळवार, २४जानेवारी रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ नगरात सुरज राजरुप राजपूत वय २६ हा तरुण राहतो. त्याच्या घरासमोर मंगलाबाई नावाची महिला वास्तव्यास आहे. २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सुरज हा त्याच्या घरासमोर उभा असतांना, मागील भांडणाच्या कारणावरुन मंगलाबाई व इतर जणांनी सुरज यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, यात एकाने सुरजच्या डाव्या हातावर चाकू मारुन दुखापत केली, यात घटनेत सुरज जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी सुरजच्या तक्रारीवरुन चार जणांविरोधात मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.