संगीत विश्वात शोककळा ! ज्येष्ठ गायिकेचे निधन

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात ९२ व्या वर्षी निधन झालंय. आज शनिवारी पहाटे त्यांचं निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्या किराणा घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत.

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील आबासाहेब तर आई इंदिराबाई अत्रे. लहानपणापासूनच प्रभा यांना संगीताची आवड होती. वयाच्या ८ व्या वर्षी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. आणि तिथुनच प्रभा यांचा संगीतमय प्रवास सुरु झाला.

प्रभा यांनी गुरुशिष्य परंपरेत संगीताचे शिक्षण घेतले. किराणा घराण्यातील सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. गायनासोबतच त्यांनी कथ्थक नृत्याचे सुद्धा प्रशिक्षणही घेतले होते. संगीताचे शिक्षण घेत असतानाच अत्रे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. नंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले.

प्रभा यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ, याशिवाय ट्रिनिटी लबन कॉन्झर्वेटोअर ऑफ म्युझिक अँड डान्स, लंडन (वेस्टर्न म्युझिक थिअरी ग्रेड-IV) येथेही शिक्षण घेतले आहे. नंतर त्यांनी संगीतात पीएचडीही मिळवली. प्रभा यांना भारत सरकारचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रभा यांच्या निधनाने संगीतविश्वातला एक तारा निखळला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.