सोने महागले चांदीचे भाव उतरले ! जाणून घ्या आजचे दर !

0

जळगाव / मुंबई ;- या वर्षाच्या सुरुवातीला सोने -चांदिने ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे. 3 जानेवारीपासून सातत्याने सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण होत आहे. मात्र, यामुळे सामान्य ग्राहक चांगलेच सुखावले आहे. सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ आता वाढली आहे. गेल्या दहा दिवसांत सोने-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, आता सोन्याच्या दरात आत वाढ झाली असून सोने आज महागले आहे. तर, चांदीचे दर आणखी खाली उतरले आहेत.

गेले दहा दिवस सलग घसरत असलेले सोने आज सावरले आहे. आज सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत सोने हे तब्बल १३०० रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, आज सोनेच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या दिवसांत होणारी घसरण पाहता, ग्राहकांना दर आणखी खाली येण्याची अपेक्षा होती. आता आजपासून पुन्हा सोन्याच्या दरांचा दर वाढीचा आलेख उंचावणार कि खालावणार असा प्रश्न सामान्य ग्राहकांना पडला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६३,१०० रुपये असा आहे. तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५७,८५० इतका आहे.

चांदीत घसरण कायम

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्याही दरांमध्ये घसरण कायम होती. यामुळे चांदिने ग्राहकांना सुखावले आहे. ३ जानेवारी रोजी ३०० रुपयांनी तर, ४ जानेवारी रोजी २००० रुपयांनी, ८ जानेवारी रोजी २०० रुपयांनी तर, १० जानेवारी रोजी 600 रुपयांनी किंमती खाली आली होत्या. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा आजचा भाव हा ७६,००० रुपये असा आहे.

 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोन्याच्या किंमतीनमध्ये वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरांत आणखी घसरण झाली आहे. असे आहेत प्रति कॅरेटनुसार असे आहेत आजचे सोन्याचे दर..

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,५१५ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,२६५ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,२६४ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,८८६ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,५७१ रुपये .

तर, एक किलो चांदीचे आजचे दर हे ७१,५३० रुपये असे झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.