अभाविप मु जे महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर

0

जळगाव ;- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत अभाविप मु जे महाविद्यालयाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून
महाविद्यालय अध्यक्ष म्हणून यश देशमुख तर महाविद्यालय मंत्री म्हणून चिन्मयी बाविस्कर यांची नियुक्ती. शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव छत्रपती शिवाजी महाराज नगराच्या वतीने मु जे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त मुख्य प्रशासकीय इमारत ते विवेकानंद भवन पर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली व स्मारकास पुष्प अर्पण करीत नगर अध्यक्ष प्रा.डॉ अखिलेश शर्मा यांनी विषयाची मांडणी केली तर रॅली समारोप नगर मंत्री गुणवंत बोरसे यांनी केला.

त्याच अनुषंगाने आजच्याच दिवशी मु जे महाविद्यालयाची नूतन कार्यकारणी देखील घोषित करण्यात आली.प्रसंगी महाविद्यालय अध्यक्ष म्हणून यश देशमुख तर उपाध्यक्ष म्हणून अविष्कार राजपूत, विवेक राजपूत ,पूजा नारखेडे यांची नियक्ती करण्यात आली. तसेच महानगर मंत्री मयूर माळी यांनी जमलेल्या छात्र शक्तीला अभाविप मांडणी करीत संबोधित केले.व कार्यक्रमाचा समारोप शिवा ठाकूर यांनी केला.

अभाविप नेहमीच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारी व राष्ट्रीय पुनर्निर्मानाच्या व्यापक संकल्पनेत कार्य करणारी जगातील सर्वात मोठी एकमेव संघटना आहे.विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी व विद्यार्थी हितासाठी अभाविप प्रत्येक वर्षी नवीन कार्यकारणी घोषणा करीत असते. प्रसंगी प्रा.विजय लोहार,नगर मंत्री गुणवंत बोरसे,महानगर सहमंत्री भाविन पाटील,ओम थोरात,शुभम खडसे,गौरव सोनार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.