मनपाच्या पथकाने जप्त केला १५१ किलो नायलॉन मांजा

0

जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी विविध भागात कारवाई करत सुमारे १५१ किलो नायलॉन मांजा केला जप्त केली. गोपाळपुरा येथील गोलू पुरण खीची यांच्याकडून नायलॉन मांजाचे १०० नग रील, सुप्रीम कॉलनीतील कृष्णा नगरात विजेश राजाराम तिवारी यांच्याकडून २६ नग रील, सुनीता दिनेश चौधरी यांच्याकडून नायलॉन मांजाचे ८० नग रील जप्त केले. चौथी कारवाई रायपूर कुसुंबा येथील सर्जराव साहेबराव पाटील यांच्याकडे करत त्यांच्याकडून वार नग रील जप्त केले.

ही कारवाई आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, उल्हास इंगळे, आणि आरोग्य निरीक्षक शुभम पोपटकर, मनोज राठोड, सुरेश भालेराव, कुणाल बारसे, चेतन हातागळे, मुकादम नंदू गायकवाड यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.