कारण नसताना तिघांनी केली एकाला फायटरने बेदम मारहाण

0

जळगाव : नेहरु चौक परिसरातून जाणारे फिरोज खान बिसमिल्ला खान (४४, रा. शाहू नगर) यांना तीन अज्ञातांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण केली. यात एकाने खान यांच्या चेहऱ्यावर फायटरने वार केल्याने त्यांना दुखापत झाली. ही घटना १० जानेवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी ११ रोजी शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लंबर काम करणारे फिरोज खान हे १० जानेवारी रोजी रात्री नेहरु चौक परिसरातून जात असताना तेथे तीन जण आले व त्यांनी खान यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यासोबतच मारहाणदेखील केली व एकाने थेट फायटर काढून खान यांच्या चेह-यावर मारला. त्यामुळे चांगलीच दुखापत झाली. या प्रकरणी खान यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या अज्ञात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकुंभ करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.