जिल्हाधिकारी आयुष प्रसाद; १० गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगारास स्थानबद्ध करण्याचे आदेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमान नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला आहे.

सूत्रांनुसार, भुसावळ (Bhusawal) शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय २९) याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात वेगवेळ्या स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार धोकादायक असल्याचा प्रस्थाव भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे बबन आव्हाड यांनी प्रस्थावत मांडले होते. हा प्रस्थाव ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सादर केले आहे. त्यानुसार या प्रस्थावाचे अवलोकन केल्यांनतर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धच्या मंजुरुसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) रा. हनुमान नगर भुसावळ याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून, मुंबई येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.