मोठी बातमी; प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल, आणि लॉकअप कन्टेस्टंट पूनम पांडेबाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे. ३२व्या वर्षी पूनमच्या निधन झाले आहे. पूनम पांडेबाबत एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पूनम पांडेच्या निधनाबाबत ही सोशल मीडिया पोस्ट असून, गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचे निधन झाल्याचे म्हंटले जात आहे.

पूनम पांडेच्या निधनासंबंधित ही पोस्ट तिच्याच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्की पूनम पांडेचे निधन झाले आहे. की फेक न्यूज आहे. अशाप्रकारच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहे. तिच्या चाहत्यांना यावर विश्वस बसत नाहीये. या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी धक्का बसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

पूनम पांडेच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहले आहे की, ‘आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आणि दुःखद होती. आम्हला कलावंतांना खूप दुःख होत आहे की, आमची लाडकी पूनम पांडेचे निधन झाले आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आम्ही तिला गमावले आहे. जोपण तिच्या संपर्कात आला आहे ती त्याच्याशी खूप प्रेमाने भेटली आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गोपनीयतेची विनंती करतो.’

Leave A Reply

Your email address will not be published.