शाळेच्या आवारातून १४ वर्षीय मुलाला फूस लावून पळविले

0

जळगाव ;- तालुक्यातील म्हसावद येथील थेपडे हायसुलच्या आवारातून १४ वर्षीय विद्यार्थ्याला फूस लावून पाळविल्याचा प्रकार ३१ जानेवारी रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि ,ओम लक्ष्मण पाटील वय १४ रा. बिलवाडी ता. जिल्हा जळगाव  याला ३१ रोजी म्हसवद येथील थेपडे हायस्कुलच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आला . याप्रकरणी मुलाचे काका कैलास पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ए सी मनोरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.