आता या शहरांमध्ये मिळणार ‘सेम डे डिलिव्हरी’, फ्लिपकार्टचा मोठा निर्णय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑनलाईन शॉपिंग करतांना सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे ऑर्डर डिलिव्हर होण्याची वाट पाहणं. अमेझॉन प्राईम युसर्सला बऱ्याच शहरांमध्ये वन-डे किंवा सेम-डे डिलिव्हरी मिळते. अशीच सुविधा आता फ्लिपकार्टनेही सुरू केली आहे. देशातील २० शहरांमध्ये फ्लिपकार्ट आता सेम-डे डिलिव्हरी देणार आहे.

या सुविधेमुळे आता फ्लिपकार्टचे युजर्स वाढवण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा देशातील इतर शहरांमध्ये देखील उपलब्ध करणार असल्याचं फ्लिपकार्टने स्पष्ट केलं. यापूर्वी देखील फ्लिपकार्टचे दहा शहरांमध्ये या सुविधेची चाचणी घेतली होती, मात्र ती लगेच बंद करण्यात आली होती. आता फ्लिपकार्टचे पुन्हा एकदा याबाबत घोषणा केली आहे.

काय आहे अट ?
सेम डे डिलिव्हरी मिळवण्यासाठी युजर्सला दुपारी १ वाजेपर्यंत ती वस्तू ऑर्डर करावी लागणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ती वस्तू तुमच्या घरी पोहोचवली जाईल. दुपारी एकनंतर ऑर्डर केलेल्या वस्तू मात्र दुसऱ्या दिवशी किंवा त्यापेक्षा उशिरा येतील.

कोणत्या शहरांचा समावेश?
मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, कोयंबतूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ, हैदराबाद, पाटणा, रायपूर, सिलीगुडी, विजयवाडा

Leave A Reply

Your email address will not be published.