पोलीस कर्मचाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मलकापूर येथील पोलीस कर्मचाऱ्याने अहेरी पोलीस स्टेशन, जिल्हा गडचिरोली येथे ड्युटीवर असतांना स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बुलढाण्यातील मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी असलेला प्रमोद चांगदेव शेगोकार हा गडचिरोलीतील अहेरी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी पदावर कार्यरत होता. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास त्याने ड्युटीवर असतांना स्वतःहाच्या पिस्तुलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागील कारण अद्यापपर्यंत कळू शकले नसुन अहेरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करित आहेत.

प्रमोद चांगदेव शेगोकार हा मुळचा मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी असुन त्याच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरातील शोककळा पसरली आहे. त्यांचेवर उद्या 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास त्यांचे मुळ गाव मलकापुर येथे अंतविधी करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.