शिशिर धारकरांनी ठेविदारांचे पैसे द्यावेत; मग पेण नगरपरिषदेबद्दल बोलावे – अजय क्षीरसागर

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

पेण अर्बन बँक घोटाळ्याचे मुख्य आरोपी शिशिर धारकर यांनी माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार रविशेठ पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी पेण नगरपरिषदेचे नगरसेवक अजय क्षीरसागर आणि भाजप पेण तालुक्याच्या वतीने आज पेण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांत ओक, भाजप युवा मोर्चा पेण शहर अध्यक्ष मितेष शहा, माजी नगरसेवक सुधीर जोशी उपस्थित होते.

पेण अर्बन बँकेचे तात्कालीन अध्यक्ष आणि शिशिर धारकर यांनी ७०० कोटींचा बँकेच्या ठेवींचा अपहार करून पेणकर आणि हजारो ठेविदारांना देशोधड़ीला लावले आहे. या अपहारामुळे कित्येक महिलांची लग्न मोडली, अनेक संसार उध्वस्थ झाले अनेक ठेविदारांचा मृत्यु झाला आहे. त्या शिशिर धारकर यांनी जे बालिश आणि बेताल वक्तव्य कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांच्यावर केले आहेत त्याचा आम्ही जाहिर निषेध करतो. धारकर यांनी आमदारांबाबत बोलतांना विचार करून बोलावे. अशा प्रकारची बेताल वक्तव्य भाजप पेण शहर हे कदापी सहन करणार नाही. भविष्यात धारकर यांना जशास तसे उत्तर देले जाईल.

पेणकरांचा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांच्यावर आहे हे ९ हजार मतांची आघाडी पेणमधून देऊन २०१९ च्या निवडणुकीत पेणच्या जनतेने सिद्ध केले आहे. ज्यादिवशी बँक बुडाली त्याच दिवशी संध्याकाळी आमदारांकड़े धारकर यांनी पायघड्या घातल्या आणि आमदारांकडे मदत मागितली. आमदार रविशेठ पाटील यांनी ठेविदारांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सहकार मंत्र्यांकड़े घेऊन गेले असता शिशिर धारकर यांनी दर महिन्याला ५० कोटि भरण्यात असल्याचे मान्य केले होते मात्र त्यांनी अद्याप एकहि रुपया भरला नाही. ते दोन वर्षात ठेविदारांना काय पैसे मिळवून देणार ? असा सवाल क्षीरसागर यांनी धारकर यांना केला. आमदार रविशेठ पाटील जनतेच्या ठेवी बुडू नयेत यासाठी शिशिर धारकर यांची मदत केली होती.

रिंग रोडसाठी केलेले आरक्षण हे धारकर यांच्याच कार्यकाळात संतोष शृंगारपुरे नगराध्यक्ष असतांना झालेले आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचा अधिकार आम्हा सत्ताधाऱ्यांना नाही. असे नगरसेवक अजय क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सफाई ठेक्यात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतांना क्षीरसागर म्हणाले की, १० वर्षयांपूर्वी धारकर यांची सत्ता असतांना ४० ते ८० रुपये रोजंदारीवर असलेल्या कामगारांना रोज दिला जायचा मात्र आता वाढलेल्या रोजंदारीमुळे प्रशासनाने आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाने त्यांना रोज ३५० ते ४०० रुपये पगार दिला जातो. त्यामुळे १० वर्षां पूर्वी असलेला ३४ लाखांचा ठेका हा ३ कोटींवर गेला असल्याचे अजय क्षीरसागर यांनी स्पष्ठ केले. पेण शहरातील नागरिकांना प्रत्येक प्रभागमध्ये शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील आणि रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वात पेण शहरात डांबरीकरण केलेले रस्ते, गॅस पाईप लाईन, पथदिवे, प्रत्येक प्रभागात स्वच्छता रोज होत असते, विजेचे नवीन खांब आणि पाण्याची नविन पाईप लाईन टाकण्याचे काम त्याच बरोबर नागरिकांना लागणाऱ्या सर्व मुलभुत गरजा या पेण नगरपारिषदेकडून पुरविल्या जात आहेत जे धारकर यांना गेल्या २५ वर्षां पूर्वी जमले नाही ते आम्ही करून दाखविले आहे.

पेणनगर परिषदेवर शिशिर धारकर यांची सत्ता असताना पेण शहराच्या पाणीपुरवठा योजने करिता शासनाकडून आलेली रक्कम ५ कोटी रुपये तत्कालीन नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांनी बेकायदेशीररित्या शासकीय बँकेत न ठेवता ती रक्कम तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर दबाव टाकून पेण अर्बन बँकेत ठेवली होती. त्यानंतर बँक बुडाली त्यामुळे शहराची पाणीपुरवठा योजना अडकून राहिली होती. परंतु माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार रवीशेठ पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पाणीपुरवठा योजने करता पुन्हा निधी उपलब्ध करून दिल्याने आज पेणच्या नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे.

शिशिर धारकर यांनी केलेले बिनबुडाचे आरोप सिद्ध करावेत अथवा भारतीय जनता पार्टी त्याचे सडेतोड उत्तर देईल. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत पेणची जनता बँक बडव्यांना हद्दपार करेल असा विश्वास यावेळी भाजप युवा मोर्चा पेण शहर अध्यक्ष मितेष शाह यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.