रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकणार ?; चर्चांना उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच वेगेवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असते. दरम्यान, आता रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनेकदा विजय देवरकोंडा आणि रश्मिका एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी ते दोघेही मुंबईत डेटवर जाताना दिसले होते. यानंतर आता दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका ही पुष्पा या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यातच रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. येत्या वर्षाअखेरपर्यंत ते दोघेही विवाहबंधनात अडकतील, असे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. या दोघांचे अफेअर सुरु असल्याचे अनेक अफवा पसरत आहेत. मात्र त्या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

काही दिवसांपूर्वी ते मुंबईत डिनर डेटसाठी जाताना दिसले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात ते एकत्र झळकले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.