पोदार इंटरनॅशनलचे विद्यार्थी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक विज्ञान प्रतिभा शोध स्पर्धेत यशस्वी !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघाने डॉ. होमी भाभा (Dr. Homi Bhabha) बाल वैज्ञानिक विज्ञान प्रतिभा शोध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा निकाल 16 एप्रिल 2023 रोजी पाटकर हॉल, एस एन डी टी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथेजाहीर करण्यात आला. त्यात पोदार इंटरनॅशनल स्कुल मधील चिन्मय ललितकुमार चौधरी आणि जय सागर जावळे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेच्या अंतिम निकालानुसार विजेत्यांना रौप्य पदक, प्रशस्ती पत्रक तसेच प्रत्येकी रु.२००० चे रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक ललितकुमार चौधरी व सागर जावळे हे देखील उपस्थीत होते. इयत्ता सहावी आणि नववीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी होवू शकतात. एकूण तीन फेऱ्यातून निवड करण्यात येत असलेल्या परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे

प्रथम फेरी- विज्ञान विषयावर अतिआव्हानात्मक प्रश्न- आधारित चाचणी

द्वितीय फेरी- विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षा

तृतीय/निर्णायक फेरी- तोंडी परीक्षा, सर्वसाधारण मुलाखत आणि प्रकल्पाचे स्पष्टीकरण

वरील तीनही फेऱ्या यशस्वीरीत्या पार करण्यासाठी चिन्मय ललितकुमार चौधरी याने कठोर सराव केला होता. इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet of Things) वापरून ‘रॉंग पोश्चर डिटेक्टर’ या विषयावर आपला प्रकल्प सादर केला. तसेच जय सागर जावळे याने इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet of Things) वापरून वापरून ‘ए कॉस्ट इफेक्टीव डायग्नोस्टिक टूल ‘ हा प्रकल्प प्रस्तुत केला व अंतिम फेरीत यश प्राप्त केले.

स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग व शाळेचे नावलौकिक उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी शाळेचे उप-प्राचार्य दीपक भावसार, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका उमा वाघ शिक्षक व सहकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.