“पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडा स्नेह मेळावा संपन्न “

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

पंडित जवाहरलाल नेहरू एसएससी बॅच 2002 चे माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न झाला सदर मेळाव्याच्या कार्यक्रमाला अनिल रामदास पाटील अध्यक्ष तर डॉ. पराग पाटील उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली सदर बॅचचे विद्यार्थी तब्बल 21 वर्षानंतर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जमले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद एकमेकांना भेटून गगनात मावत नव्हता अशी स्थिती झालेली होती.

अनिल रामदास पाटील (अध्यक्ष), डॉ पराग पाटील( उपाध्यक्ष), हेमंतकुमार आत्माराम महाजन(चेअरमन), घनश्याम विश्वनाथ पाटी (कार्यकारणी सदस्य ), सुनिल दगडू महाजन(माजी सभापती), अतुल वासुदेव महाजन – (शालेय समिती सदस्य), योगराज सुपडू बडगुजर – (माजी सैनिक), लक्ष्मण उत्तम कोळी (सरपंच), योगेश दगडू पाटील (उपसरपंच), शिवाजीराव महारू पाटील सर (कै. माजी मुख्याध्यापक यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य), कै. एम. एस. पाटील इत्यादी उपस्थित होते. सर्व अतिथी यांना शाल व बुके देऊन सत्कार केला माजी शिक्षक व कै. माजी शिक्षक यांच्या कुटुंबातील प्रमुख यांना शाल, बुके व विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचे सन्मानपत्र देण्यात आले आणि अतिशय उत्साह पूर्ण असा हा स्नेहसंमेलनाचा मेळावा पार पाडण्यात आला.

आपणही या शाळेचे काही देणे लागतो या कृतज्ञतेच्या भावनेने सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींच्या हस्ते शाळेला दोन एल. ई.डी. टीव्ही संच भेट दिले त्याबद्दल शाळेने सर्व माजी विद्यार्थ्यांना आभार पत्र दिले तसेच माजी विद्यार्थी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष श्री. सोपान भीमराव मोरे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा फोटो शाळेला भेट म्हणून दिला. शेवटी माजी विद्यार्थ्यांचे गुरुवर्य श्री आर. ए. सोनवणे यांनी या विद्यार्थ्यांना उद्देशून ही बॅच म्हणजे आमची गुणाची खाण अशी बॅच असून अतिशय यशस्वी अशी ह्या बॅच मधले विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या असे सांगून त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून प्रेरणा देण्याचं प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर. के. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी केले. सदर मेळाव्याची कल्पना रामेश्वर भबुत धनगर आणि रफिक सलाउद्दीन पिंजारी यांनी मांडली सदर कार्यक्रमासाठी अतुल प्रकाश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले तरी सदर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय एसएससी बॅच 2002 चे सर्व माजी विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.